college कट्टा


    कधी रेशमी नात्यामध्ये गुरफटलेले भावबंध कधी हृदयातील तरल , तरंग, कधी ओल्या मातीच गंध , खर तर कौलेजचे ते सोनेरी दिवस या चारोल्यामध्ये बंदिस्त करण कठीणच. शेवटी कोणीतरी म्हणालाच आहे, या सोनेरी दिवसातील सोन विकूनच, तर आपण मोठे झालेलो  असतो, ते विश्वच वेगळ  असतं . इथे बहरते निरागस मैत्री . इथे उमलते निष्पाप प्रेम . इथे  एकच कॉल्ड्द्रींक सगळे जण शेयर करतात. फेअशन बदलते रगेबिरंगी चित्र इथेच पाहायला मिळते .झकास शिव वडापावपासून ते  मेकडीच्या बर्गर पर्यंत आणि चटपट्टीत गोसीपपासून ते exam fandya  पर्यंत सार काही या कट्ट्यावर. 


जगापासून लपवलेल सार काही इथेच कन्फेस केल जात . funky outfits , cool attitude , big smiles and smart  studies  चे जणू प्रतिक असलेला आपला कॉलेज ग्रूप हेच आपल जग असतं. इतरांसाठी हा फक्त एक कट्टा असतो पण college वीरासाठी ते असतं एक अल्लाड्पण जे अजूनही लहान आहोत याची जाणीव करून देत आणि दुसर्याच शनी हा कट्टा बाहेरच्या जगाशी सामना करण्याच बाल देतो . हा कट्टा वर्षनुवर्ष असाच राहतो . इथे जमणारे तारे मात्र बदलतात



.