मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारी

 फेब्रुवारी  महिना म्हणजे फक्त प्रेम व्यक्त  करणायचा महिना अस सगळ्याच्या लक्षात राहत पण २७ फेब्रुवारी हा दिवस दिग्गज कविवर्य कुसुमाग्रज जयंती दिवस मराठी राजभाषा दिन साजरा होतो हे कोणाच्याही लक्षात राहत नाही.आपण संकल्प करूयात मराठी मातीच, मराठी बोलीच आपण नाव उज्वल करू आणि आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!





मराठीचा बोल


माझ्या मराठीचा बोल वाजे काळजात खोल ,
अम्रताहूनही आहे ओवी महाराष्टात अनमोल

इथे विठोबा असे सावली
पण मायबोली असे माउली

माझ्या मराठी मातीची खोलवर रुझे नाळ
सळसळतो आहे आमच्या रक्तातून पिंपळपान 


..
                            निशिगंधा




कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा होत आहे. 


ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी १९१२ मध्ये झाला होता. कवितेमध्ये रमतांना कुसुमाग्रजांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातही मुक्त विहार केला. वयाच्या १७व्या वर्षापासून 'बालबोधमेवा' या मासिकातून कुसुमाग्रजांनी कविता आणि ललित साहित्य लिहायला सुरुवात केली. १९४२मध्ये प्रसिद्ध झालेला 'विशाखा' हा त्यांचा काव्य संग्रह साहित्यातला ठेवा आहे.




लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
धर्म पंथ जात एक जानतो मराठी 
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 


आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या मना मनात दंगते मराठी 
आमच्या रगा रगात रंगते मराठी 
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी 
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥ 


आमच्या पिलापिलात जन्मते मराठी 
आमच्या लहानग्यात रांगते मराठी 
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी 
आमच्या घराघरात वाढते मराठी 
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी 
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी 
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी 
येथल्या नगा नगात गर्जते मराठी 
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी 
येथल्या वनावनात गुंजते मराठी 
येथल्या तरुलतात साजते मराठी 
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥ 


येथल्या नभामधुन वर्षते मराठी 
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी 
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी 
येथल्या चराचरात राहते मराठी॥ 


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी 
बोलतो मराठी ऎकतो मराठी 
जानतो मराठी मानतो मराठी 
दंगते मराठी... रंगते मराठी.. 
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. 
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी ||