मोर
निळा जाभाळा पिसारा फुलवून
स्वप्नात नाचतात अधूनमधून इच्छांचे मोर
जागेपणी उरते
अतृप्त हुरहूर ....
स्वप्नातला तो हिरवा अदभूत प्रदेश ,
मोरांचा निळा मखमली स्पर्श
जाणीव नेनिवेच्च्या
सीमारेषेवर रेगालात राहतो
एकदा अक्स्न्मात त्या देशात पूल पडल
आणि नादावलेला संभ्रम हळुवार अलन पडले
दात हिरव्या , शांत प्रदेशात .
मोर असतात दडून
असे ...... लांबवर दिसतात ,
त्यांच्या मागे दबक्या पावलांनी पावलं टाकून
जवळ जायीप्रयंत ते क्षणात अदृश्य होतात
गवतात ..........
त्यांचे आवाज सळसळत राहतात शांत वारयात
दृष्टी अधीर भिरभिरते , शरीर अस्तित्व विसरते
मोर दिसत राहतात इथे तिथे , पण लांबच लांब
हाथी कधीच न येणारे
स्वप्नात नाचणारे मोर हि मोरासार्खेच
हाथी कधीच न येणारे ,
सौदर्याची अतुर्प्त अनुभूती देणारे ..............
0 comments:
Post a Comment