पहाट 




चांदणे निघाले आपुल्या घरी जागली पहाट,
तारयांची अवराआवारी भागली पहाट .

निजलेल्या डोळ्यात येई स्वप्न बहराई
जागल्या डोळ्यात माज्या थांबली निळाई.

निळ्या ढगांवर सांडली पहाट
मोगर्याला भूल देई सुंदर पहाट
.
केशरी दवांच्या रंग बहरू लागे
चंद्र येत बोहल्यावर पहाट जागे

पापण्यांचे गोड वळसे किरण सूर्याचे
नयनास मग श्वास किरणांचे

धून साप्त्धानुची मग हळूच दाटे
आणि निळ्या भोर आकाशात पहाट साठे .
                                निशीगंधा